Nilesh Lanke : अहिल्यानगरमध्ये केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करा, खासदार नीलेश लंके यांची मागणी


विक्रम बनकर, अहिल्यानगर : 'प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जात असले तरी अद्यापपर्यंत राज्यात एकही केंद्रीय विश्वविद्यालय नाही. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यात केंद्रीय विश्वविद्यालय सुरू करा,' अशी मागणी खासदार नीलेश लंके यांनी संसदेत शुन्य प्रहरातील प्रश्नोत्तरादरम्यान केली. 

यावेळी बोलताना लंके म्हणाले, 'महाराष्ट्राकडे प्रगत राज्य म्हणून पाहिले जाते. परंतू अद्यापपर्यंत महाराष्ट्रात एकही केंद्रीय विश्व विद्यापीठ नाही. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी बाहेरच्या राज्यात जावे  लागते. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी. त्यासाठी आवष्यक ती कार्यवाही करण्यात यावी. त्याचा फायदा महाराष्ट्रासह गोवा या राज्यालाही होईल.'

वाचा : बिबट्यांसाठी संरक्षित क्षेत्र उभारणार, मंत्री भुपेंद्र यादव यांची खासदार लंके यांना ग्वाही

'दिल्ली युनिव्हर्सिटी, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय ओपन युनिव्हर्सिटी  असे केंद्रीय विश्वविद्यालये विविध राज्यांमध्ये स्थापन करण्यात आलेले आहेत. ही केंद्रीय विश्वविद्यालये हिंदी भाषिक राज्ये सोडता महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलेली नाहीत,' असे सांगतानाच लंके पुढे म्हणाले, 'कृषी प्रधान मतदारसंघ असलेल्या अहिल्यानगर जिल्हयात राहुरी, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगांव, कर्जत, जामखेड,  श्रीगोंदा या भागात शेतकरी फार्मसी प्रोडयुसर कंपन्यांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी लॉजिस्टिक पार्क सुरू करावे, अशी मागणीही लंके यांनी संसदेत केली. 

पहा व्हिडीओ : छत्रपती शिवरायांचे विचार सरकार विसरले,वक्फ बोर्डाच्या विधेयकावरून खा. लंके यांचा हल्लाबोल

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने