विक्रम बनकर, अहिल्यानगर : अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी गडकिल्ले स्वच्छता आणि संवर्धन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमे अंतर्गत श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे असलेल्या धर्मवीर गडावर खासदार लंके यांच्यासह कार्यकर्त्यांनी स्वच्छता मोहीम पार पडली. यावेळी किल्ल्यातील स्वच्छतेसह झाडांना रंगरंगोटी देखील केली. या स्वच्छता मोहिमेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील सहभाग घेतला. त्यांनी धर्मवीर गडावर स्वतः झाडू हातात घेऊन स्वच्छता केली.
शिवजयंती पासून गडकोट किल्ल्याच्या स्वच्छतेची मोहीम सुरू केली असून आता मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू झाला असल्याचं खासदार लंके यांनी सांगितले. तर,खासदार लंके यांनी एक स्तुत्य उपक्रम सुरू केला असून राज्यभरातून शिवप्रेमी आणि कार्यकर्ते या स्वच्छता मोहिमेत सहभागी होत असल्याचं जयंत पाटील यांनी म्हंटले आहे.
पहा व्हिडिओ : गडकिल्ले संवर्धनाबाबत काय म्हणाले प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
दरम्यान, एक दिवस शिवरायांच्या गड, किल्ले आणि दुर्गांसाठी या नीलेश लंके यांच्या संकल्पनेतील मोहीमेअंतर्गत धर्मवीर गडावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडविलेल्या गड किल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छता ही आपल्या संस्कृतीची आणि इतिहासाची सेवा आहे. याच ध्यासातून शुक्रवार दि.१३ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता खा. नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली नीलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने धर्मवीर गडावर स्वच्छता व सवंर्धन मोहीमेस प्रारंभ करण्यात आला.
या उपक्रमात विविध सामाजिक संस्था, सुचक मंडळं, विद्यार्थी, महिला मंडळं, आणि सर्वसामान्य नागरीकांचा उस्फुर्त प्रतिसाद दिला. या मोहिमेसाठी अहिल्यानगर शहर आणि पारनेर येथून जाण्या-येण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती.
पहा व्हिडिओ : धर्मवीर गडावर अशी पार पडली स्वच्छता मोहीम
टिप्पणी पोस्ट करा