NMMC : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाचा पेपरलेस कारभार

ब्युरो टीम :  राज्य सरकारने क्षेत्रीय, शासकीय व निमशासकीय कार्यालयांकरिता १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत नमूद मुद्दयांवर प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत सूचना / निर्देश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमात ई - ऑफिस तसेच रजा व्यवस्थापन प्रणाली (Leave Management System - LMS) प्रणाली  अंमलबजावणी करण्यात आलेली  आहे.

शासकीय कामकाजात सुसूत्रता यावी, दस्तऐवज सुरक्षित राहावे आणि निर्णय प्रक्रिया गतिमान व सुलभ व्हावी, याकरीता सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागांत तसेच क्षेत्रीय कार्यालयांमध्ये शासकीय कामकाज ई-ऑफीस प्रणालीव्दारे करण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामध्ये १३ जानेवारी २०२५ रोजी परिपत्रक निर्गमित करून सर्व कार्यालयीन कामकाजाकरिता ई-ऑफीसाचा वापर सुरू करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत परिवहन उपक्रमात  जानेवारी २०२५ ते  मार्च २०२५ पर्यंत  ई - ऑफिसद्वारे ७९१ नस्ती तयार करण्यात आलेल्या आहेत. ई-ऑफिस प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे  कामात गती आणि कार्यक्षमतेत वाढ झालेली आहे आमि वेळेची मोठी बचत होत आहे. त्याचप्रमाणे ई-ऑफीसमुळे उपक्रमाच्या कामात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढली आहे.

ई ऑफिस मुळे सर्व दस्तऐवज डिजिटली संग्रहित केले जातात, त्यामुळे सर्व रेकॉर्ड्स सुस्थितीत ठेवण्यास मदत होत आहे. तसेच कागद व स्टेशनरीवरील खर्च कमी झालेला आहे. याशिवाय दस्तऐवज सुरक्षित ठेवणे जास्त सोयीचे झाले आहे. तसेच पासवर्ड आणि अन्य सुरक्षा वैशिष्ट्यांचा वापर केल्याने सुरक्षितता वाढली आहे.यासोबतच नस्ती किंवा कागदपत्रे शोधणे सोपे झाल आहे.

ई-ऑफिसमुळे अधिकारी व कर्मचारी २४ तास कामगिरी करण्यास सक्रीय होऊन त्यांना इतर ठिकाणांहून काम करता येत असून त्यामुळे कामात जलद गती आली आहे. ई-ऑफिस प्रणालीमुळे परिवहन उपक्रमाच्या कामकाजात पारदर्शकता येऊन कामाचा निपटारा जलद गतीने होत असल्याचे नमुंमपा परिवहन उपक्रम प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने