Pandharpur : चैत्री यात्रेसाठी चंद्रभागा नदीपात्रात सोडले पाणी


ब्युरो टीम: चैत्र  शुध्द एकादशी  ०८ एप्रिल  २०२५ रोजी असून,  यात्रा कालावधी  दि.०२  ते १२ एप्रिल आहे.  या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. वारकऱ्यांसाठी चंद्रभागेचे स्नान फार पवित्र मानले जाते.श्री विठ्ठल- रुक्मिणीमातेचे दर्शन घेण्यापुर्वी भाविक चंद्रभागा स्नान करतात. तसेच चैत्र महिन्यात कावडी स्नानासाठी देखील कावडी घेऊन मोठ्या प्रमाणात भाविक येतात.भाविकांना चंद्रभागाभागा नदी पात्रात पवित्र स्नान करता यावे. यासाठी दगडी पूला जवळील नगरपरिषदेच्या बंधाऱ्यातून २५० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे.            

चंद्रभागा नदीपात्रातील पाण्याची पातळी कमी झाल्याने व जास्त काळ पाणी साठून राहिल्याने पाण्यावर शेवाळे येऊन पाणी जास्त काळ साठल्याने पाणी घाण झाले होते. नदीपात्रातील शेवाळे व घाण पाणी वाहून जावे यासाठी पिराच्या कुरोली येथील बंधाऱ्यातून गुरसाळे येथील बंधाऱ्यात व गुरसाळे येथील बंधाऱ्यातून दगडी पूला शेजारी असलेल्या बंधाऱ्यात पाणी घेऊन ते पाणी चंद्रभागा नदीपात्रात  २५० क्यूसेक्सने सोडण्यात आले.  पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार  उपविभागीय अधिकारी  सचिन इथापे यांनी  कार्यकारी अभियंता भीमा पाटबंधारे विभाग व पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून नगर परिषदेच्या बंधारे  मधून  चंद्रभागा नदी पात्रामध्ये पाणी  सोडण्यात आले. नगर परिषदेच्या बंधार्‍यामधून भाविकांच्या सोयीसाठी  चंद्रभागा नदीपात्रामध्ये पाणी सोडण्यात आल्याने व चैत्री यात्रेमध्ये भाविकांना स्नानासाठी पाणी उपलब्ध झाल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे 

पहा व्हिडीओ

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने