Pandharpur :'या' दोन मंत्र्यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन


ब्युरो टीम :  राज्याचे सार्वजनिक बांधकाम  (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री  शिवेंद्रसिंहराजे  भोसले , मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव - पाटील यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे  दर्शन घेतले.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके  यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तसेच व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद  पाटील यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.   

यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी मंदिर  विकास आराखड्या अंतर्गत  सुरू असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर जतन व संवर्धनच्या कामाबाबतची माहिती दिली.

याप्रसंगी आमदार समाधान अवताडे, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष  हरीश पाटणे, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता (विद्युत विभाग) श्रीनिवास  गुजरे, लेखाधिकारी मुकेश आनेचा यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

पहा व्हिडिओ

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने