ब्युरो टीम : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्य तिथी सोहळ्यास शनिवार दि. १२ एप्रिल २०२५ रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे रायगड जिल्हा दौऱ्यावर आहेत.
दौऱ्यात रायगड जिल्ह्यातील किल्ले रायगड व सुतारवाडी येथे केंद्रीय गृहमंत्री शहा भेट देणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुरक्षा कारणास्तव सकाळी ७ ते दुपारी ४ या वेळेत २ कि.मी. परिसरात ड्रोन, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हॅडग्लायडर्स इत्यादींच्या वापरावर बंदी घातली आहे.
या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता कलम २२३ अंतर्गत कारवाई करण्यात येणार येईल असे जिल्हाधिकारी जावळे यांनी कळविले आहॆ.
टिप्पणी पोस्ट करा