ब्युरो टीम : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह निमित्त आज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय सांगली येथे अंधश्रद्धा निर्मूलन अंतर्गत जादूटोणा विषयी कायद्याची माहिती व प्रयोग तसेच चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती अध्यक्षा प्रतिभा इंगळे, उपायुक्त नागनाथ चौगुले, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, जिल्हा जाती पडताळणी समिती चे संशोधन अधिकारी मेघराज भाते, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालक श्रीमती भांबुरे, महानगरपालिका उपायुक्त शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त प्रज्ञा त्रिभुवन, अनिस संपादक राहुल थोरात, आशा धनाले, त्रिशला शहा, जगदीश काबरे आदि उपस्थित होते.
यावेळी अनिस संपादक राहुल थोरात यांनी अंधश्रद्धा व जादूटोणा विषयी सविस्तर माहिती दिली. अनिस या संस्थेतील आशा धनाले व त्रिशला शहा यांनी अंधश्रद्धा अंतर्गत येणाऱ्या जादू विषयी प्रयोगाचे प्रदर्शन करून दाखविले व सभागृहातील लोकांना अघोरी प्रथा कशा होतात याबाबत अवगत केले. विज्ञान अभ्यासक जगदीश काबरे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले. सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी प्रास्ताविक केले व सामूहिक उद्देशिका वाचन केले. कार्यक्रमास समाज कल्याण कार्यालयातील सर्व कर्मचारी, तालुका समन्वयक, समतादूत, नागरीक उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा