Sangli : सामाजिक समता सप्ताह निमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा


ब्युरो टीम : सामाजिक समता सप्ताह निमित्त आज समाज कल्याण कार्यालय सांगली येथे जेष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा व आरोग्य शिबीर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

समाज कल्याण सांगली कार्यालय, माधवबाग क्लिनिक, सांगली आणि नयनतारा क्लिनिक होम सांगली यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास समाज कल्याण सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे, प्रादेशिक विभाग फेसकॉम सांगली चे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण, ज्येष्ठ नागरिक जगन्नाथ मोरे-पाटील, बापू जाधव, प्राध्यापक श्री. बीराजे, माधवबाग क्लिनिक सांगली च्या डॉ. प्रियांका गायकवाड, नयनतारा क्लिनिक होम सांगली चे डॉ. प्रशांत ऐवळे आदि उपस्थित होते.

प्रादेशिक विभाग फेसकॉम सांगली चे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण म्हणाले, जेष्ठ नागरिकांनी विविध अडीअडचणीवर हसत हसत मात द्यावी. आई-वडील कल्याणकारी कायदा-2007 प्रभाविपणे राबविणे गरजेचे असल्याचे सांगितले. मुख्यमंत्री वयोश्री योजना, तीर्थ दर्शन योजना प्रभावीपणे राबवावी, पेन्शनसाठी निर्माण होणाऱ्या विविध समस्यांबाबत पाठपुरावा करण्यात यावा, असे ते म्हणाले.

यावेळी डॉ. प्रियांका गायकवाड यांनी जेष्ठ नागरिकांच्या आरोग्याविषयी काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. प्रशांत ऐवळे यांनी डोळ्यांविषयी घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. जगन्नाथ मोरे-पाटील यांनी ज्येष्ठांना समाजिक जीवन जगताना येणाऱ्या अडीअडचणीवर कशा रितीने मात करता येईल याबाबत मार्गदर्शन केले. बापू जाधव व प्राध्यापक श्री. बीराजे  यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी रक्त तपासणी, डोळे तपासणी, रक्तदाब, शुगर इत्यादी सर्व तपासणी शिबीरास जेष्ठ नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास विविधि पुरस्कार प्राप्त जेष्ठ नागरिक, विविध जेष्ठ नागरिक संघांचे पदाधिकारी, जेष्ठ नागरिक, समाज कल्याण कार्यालयीन कर्मचारी, तालुका समन्वयक, बार्टीचे समतादूत उपस्थित होते.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने