Sangli : जम्मू-काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेले जिल्ह्यातील नागरिक सुरक्षित

ब्युरो टीम : जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे दि. 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवादी हल्ला झाला. सांगली जिल्ह्यातील 30 पर्यटक काश्मीर येथे अडकले असल्याची प्राथमिक माहिती दि. 24 एप्रिल 2025 रोजीचे सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिल्हा नियंत्रण कक्षास प्राप्त झाली आहे. या पर्यटकांशी संपर्क झालेला असून सर्व 30 पर्यटक सुरक्षित असल्याबाबत कळविण्यात आले असल्याची माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली आहे.

या पर्यटकामध्ये सांगली शहरातील 10, कडेगाव 5, पलूस 8, मिरज 7 असे एकूण 30 नागरिक आहेत. यामध्ये सांगली शहरातील प्रतापसिंह राजपूत, ज्योती राजपूत, संतोष जगदाळे, वर्षा जगदाळे, अन्नपूर्णा भोसले, निशांद भोसले, रितेश जाधव, मनीषा जाधव, अलका जाधव व रिया जाधव, कडेगाव तालुक्यातील येडे येथील रामदास बाबर, सुर्यकांत कदम, दिपक अभंग, आप्पाजी सरगर व रामचंद्र जाधव, पलूस तालुक्यातील कुंडल येथील अविनाश लाड, शोभा लाड, वैभव लाड, संगीता लाड, विकास लाड, दिपाली विकास लाड, नितीन लाड व दिपाली नितीन लाड, मिरज शहरातील प्रमोद जगताप, वंदना जगताप, स्वरांजली जगताप, प्रांजली जगताप, विराज जगताप, फुलचंद शिंदे व हेमलता शिंदे यांचा समावेश आहे.

पाहायला मिळाले.

पहा व्हिडिओ : दहशतवादा विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक, इंग्रजी भाषणातून जागतिक संदेश

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने