ब्युरो टीम :- प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी 2024 या हंगामाकरीता अधिसूचीत क्षेत्रातील अधिसूचीत पिकांसाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. जिल्ह्यासाठी रब्बी 2024 मध्ये ओरिएंटल इन्सुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पिक विमा योजनेतर्गंत रब्बी 2024 मध्ये जिल्ह्यातील शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला आहे.
या योजनेंतर्गत सहभागी शेतक-यांना आवाहन करण्यात येते की स्थानिक नैसर्गिक आपत्ती जसे की गारपीट, भूस्खलन विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या कारणामुळे तसेच काढणी पश्चात गारपीट , चक्रीवादळ , चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगर मोसमी पावसामुळे अधिसूचीत पिकाचे नुकसान झालेले असल्यास संबंधित नुकसान झालेल्या शेतक-यांनी घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत त्यांच्या नुकसानीबाबतची सूचना पिक विमा कंपनीकडे नोंद करण्यासाठी पिक विमा मोबाईल अॅप अथवा कृषि रक्षक पोर्टल टोल फ्री क्रमांक 14447 किंवा PMFBY Whatsup Chatbox क्रमांक 7065514447 या क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा