Solapur Job Update :17 एप्रिल 2025 रोजी स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन


ब्युरो टीम : पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सोलापूर आणि प्रयास मागासवर्गीय बहुद्देशिय संस्था सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक 17 एप्रिल 2025 रोजी स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

उमेदवारांनी स्वंयरोजगार मेळाव्यासाठी गुरुवारी दिनांक 17 एप्रिल, 2025 रोजी ठीक सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत "पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अध्यासन केंद्र रंगभवन सोलापूर" येथे उपस्थित रहावे.

सदर स्वयंरोजगार मेळाव्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित, महात्मा फुले मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ मर्यादित, दिव्यांग वित्त विकास महामंडळ मर्यादित, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्या, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित, इतर मागास वर्ग आर्थिक विकास महामंडळ मर्या, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महिला आर्थिक विकास महामंडळ मर्यादित, महानगरपालिका, सोलापूर, जिल्हा उद्योग केंद्र, सोलापूर, आर सेटी प्रशिक्षण संस्था, जिल्हा रेशीम कार्यालय, सोलापूर, जिल्हा अग्रणी बँक (बैंक ऑफ इंडिया) इ. उपस्थित राहणार आहेत.

याबाबत अधिक माहितीसाठी कार्यालयीन वेळेत 0217-2992956 या दूरध्वनीवर अथवा प्रत्यक्ष भेटीद्वारे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नॉर्थकोट, पार्क चौक, सोलापुर येथे संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर श्रीमती संगीता खंदारे, यांनी केले आहे.                   

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने