ब्युरो टीम : पोटाचे (Stomach) आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहारात काही विशिष्ट घटकांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण पोटातील Good Bacteria हे केवळ पचनासाठी नव्हे, तर संपूर्ण शरीरासाठी फायदेशीर असतात. ते रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढवतात, आणि पचनशक्ती मजबूत ठेवतात. यामुळेच तज्ज्ञ सतत सल्ला देतात की Stomach Health आणि Gut Health जपण्यासाठी योग्य आहार घेतला पाहिजे.
तृणधान्यांचा करा समावेश (Include Whole Grains)
एका रिपोर्टनुसार, तृणधान्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो. या धान्यांमध्ये असणारे फायबर Prebiotics प्रमाणे काम करतात आणि Good Bacteria वाढवण्यास मदत करतात.
फायबरयुक्त फळे व भाज्या खाणे फायदेशीर (Fiber-Rich Fruits and Veggies Are Key)
फळे आणि भाज्यांमध्ये असलेले फायबर आतड्यांचे आरोग्य सुधारते. यासोबतच दही, ब्लूबेरी, बिया आणि सेंद्रिय भाज्यांमध्ये Probiotics आणि Prebiotics भरपूर प्रमाणात असतात, जे Gut Health सशक्त करतात.
हिरव्या पालेभाज्यांचा नियमित समावेश (Add Leafy Greens to Your Diet)
पालक, ब्रोकोलीसारख्या पालेभाज्यांमध्ये लोह, फायबर आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. यांचा आहारात नियमित समावेश Stomach Health आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो.
अँटी इंफ्लेमेटरी आहार ठरतो उपयुक्त (Anti-inflammatory Foods for Better Digestion)
अशा पदार्थांमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स, अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात, जे शरीरातील सूज कमी करतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारतात.
जर तुमचं Stomach Health चांगलं असेल, तर तुम्ही अनेक आजारांपासून सुरक्षित राहू शकता. त्यामुळे आजपासूनच तुमच्या आहारात योग्य बदल करून Gut Health सुधारण्यास सुरुवात करा.
टिप्पणी पोस्ट करा