Summer tips : उन्हाळ्यात अशी घ्या काळजी


विक्रम बनकर, अहिल्यानगर : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. गेल्या दहा दिवसांपासून सातत्याने नगरचा पारा हा ३७ ते ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहिला आहे. या वाढत्या तापमानात उष्माघातापासून वाचण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. वाढत्या उन्हाचे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी नेमके काय करणे गरजेचे आहे, ते जाणून घेऊ

अशी घ्या काळजी :

  •  तहान नसल्यास ही पुरेसे पाणी प्या.
  • सौम्य रंगाचे, सैल आणि कॉटनचे कपडे वापरा.
  • बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.
  • प्रवास करताना सोबत पाणी घ्या.
  • आपले घर थंड ठेवा, पडदे, झडपा, सनशेड बसवा आणि रात्री खिडक्या उघड्या ठेवा.
  • उन्हात डोक्यावर छत्री, टोपीचा वापर करा. डोके, गळा, चेहऱ्यासाठी ओल्या कपड्याचा वापर करा.
  • अशक्त, कमजोरी असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
  • ओआरएस, लिंबूपाणी, ताक आदींचे सेवन करा.
  • जनावरांना सावलीत ठेवा आणि पुरेसे पाणी द्या.
  • फॅनचा वापर करा, थंड पाण्याचे अंघोळ करा.

हे करू नका 

  • लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
  • दुपारी बारा ते तीन या वेळेत बाहेर उन्हात जाणे टाळावे.
  • गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
  • बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.
  • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी, मद्य, कार्बोनेटेड थंडपेय यांचा वापर टाळावा.
  • उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका.

पहा व्हिडिओ : दहशतवादा विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक, इंग्रजी भाषणातून जागतिक संदेश

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने