Waqf Amendment Bill : वक्फ सुधारणा विधेयकावर आज संसदेत चर्चा


ब्युरो टीम : वक्फ सुधारणा विधेयक २०२४ आज, मंगळवारी (२ एप्रिल २०२५) लोकसभेत चर्चेसाठी मंडलं जाणार आहे. या विधेयकावर सत्ताधारी व विरोधी गटातील पक्ष काय भूमिका घेतात, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. या विधेयकवरून आज संसदेत गोंधळ होण्याची शक्यता आहे.

वादग्रस्त वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी १२ वाजता नवं वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडलं जाणार आहे. या विधेयकावर सभागृहात आठ तास चर्चा केली जाईल, अशी माहिती केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे. 

दरम्यान, या वक्फ दुरुस्ती विधेयकावरून सभागृहातील सदस्यांचे दोन गट पडले आहेत. त्यात भारतीय जनता पक्ष, काँग्रेस या प्रमुख पक्षांसह इतर पक्ष काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने