ब्युरो टीम : वक्फ सुधारणा विधेयक २०२४ आज, मंगळवारी लोकसभेत चर्चेसाठी मांडलं जाणार आहे. या सत्ताधारी व विरोधी गटातील पक्षांच्या भूमिकांना महत्त्व प्राप्त झालं आहे. चला तर वक्फ सुधारणा विधेयकातील काही प्रमुख तरतुदींबाबत जाणून घेऊ.
- वक्फ बोर्डात बिगर मुस्लीम समुदायाच्या सदस्याच्या समावेशाची तरतूद चर्चेत आली आहे.
- वक्फ बोर्डांची जबाबदारी असणाऱ्या मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री हे सेंट्रल वक्फ कौन्सिलचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. सध्या या कायद्यानुसार कौन्सिलचे सर्व सदस्य मुस्लीम असावेत व त्यातील दोन महिला असाव्यात अशी तरतूद आहे. मात्र, प्रस्तावित सुधारणा विधेयकात कौन्सिलमधील आवश्यक सदस्य असणारे खासदार, माजी न्यायमूर्ती किंवा समाजातील मान्यवर मंडळी ही मुस्लीम समुदायातील असण्याची आवश्यकता नाही, असं विधेयकात नमूद करण्यात आलं आहे.
- याव्यतिरिक्त मालमत्तेच्या मालकीसंदर्भातही सुधारणा विधेयकात तरतूद करण्यात आली आहे.
- वक्फची मालमत्ता म्हणून ओळखल्या गेलेल्या मालमत्तेच्या मालकीबाबत संभ्रम निर्माण झाल्यास त्यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना असतील. जिल्हाधिकारी यासंदर्भातला अहवाल राज्य सरकारला सादर करतील, असंही सुधारणा विधेयकात नमूद करण्यात आलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा